अकुतोथय गीता साने – १
वाशीमला भटगल्ली संपते तिथे थोडीशी मोकळी जागा आहे. हा टिळक चौक. त्या चौकात आजूबाजूच्या जुनेर घरांच्या मानाने एक नवी नेटकी इमारत ताठ उभी होती. तिला साने वकिलांचा वाडा म्हणत. पण आम्ही पाहिला तेव्हा तिथे रामभाऊची खाणावळ असे. मधू कायन्देबरोबर मी तिथेअधेमधे गेलो आहे. या वास्तूत थोड्याच वर्षामागे अग्नीसारखी तेजस्वी माणसे वसतीला असत याची आम्हाला तेव्हा …